काजू कतली (kaju katali)recipe in marathi

मराठी रेसिपी
काजू कतली (kaju katli)recipe
काजू कतली ही एक प्रसिध्द मिठाई आहे.काजू कतली हे नाव जरी घेतले तरी तोंडाला पाणी सुटते.आपण मार्केट मधून काजू कतली ही महाग भेटते त्यामुळे ती घरी बनवली तर कमी खर्चात होते. व घरी बनवलयामुळे ती आपल्याला हवी तशी बनवता येते. घरीच झटपट काजू कतली ही कशी बनवायची ते बघूयात.

साहित्य:
250grm काजू, 
150grm साखर,
1/2विलायची विलायची पावडर,
1कप दुध,
 चांदीचा वर्ख(सजावटीसाठी),
1चमचे तुप

कृती:
सर्व प्रथम साखर मिक्सर मधून बारीक करून घ्यावी. त्यानंतर काजू देखील मिक्सर मधून बारीक करावे. 
काजू बारीक करत असताना मधे मधे थांबून काजू चेक करून घ्यावेत.
त्यानंतर काजूची पावडर, बारीक केलेली साखर, दुध व विलायची पावडर घालून एकञ करून घ्यावे.
 व चांगले मिक्स करून घ्यावे. त्यात गुठळ्या राहु देऊ नये.
एका जाड बुडाचया कढईत हे मिश्रण टाकून ते चांगले उकळून घ्यावे. ते चांगले घट्ट होईपर्यंत हलवत राहावे.
चांगले घट्ट झाले कि त्याला एका ताटात किंवा पोळपाटाला तूप लावून हे मिश्रण त्यावर पसरून घ्यावे. 
वरून चांदीचा वर्ख लावून त्याच्या काजू कतलीच्या आकाराच्या वड्या कापून घ्याव्यात.
टिप:
दुधाऐवजी मिलक पावडर देखील वापरू शकता.


टिप:इमरती रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/05/imaratirecipe-in-marathi.html



Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 

Comments

Post a Comment

तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you

Popular Posts