कचोरी (kachori)recipe in marathi

  कचोरी ही लहानापासून मोठयापर्यंत सर्वाची आवडती आहे.लाॅकडाऊन असल्यामुळे बाहेरील खाने आपण टाळत आहोत. तर चला मग घरीच झटपट कचोरी कशी बनवायची ते बघूया.
मराठी  रेसिपी
कचोरी (kachori)recipe in marathi
साहित्य:
200ग्रॅम मैदा,1/2ओवा,
 1/2वाटी मुग डाळ(4-5तास भिजवावे),
 1/2चमचा जिरे पावडर,
 1/2बडीशोप,
 1चमचा धने पावडर, 
आलं लसूण पेस्ट, 
1चमचा लिंबू रस,
1 चमचा लाल तिखट व मीठ चवीनुसार, 
तळण्यासाठी तेल 

कृती:
कचोरी साठी अगोदर मैदा, मीठ व ओवा एकञ करून घ्यावे. 
व त्याची घट्टसर कणीक मळून घ्यावी. 
ती एका कपड्याने झाकून ठेवावी. 
मुगाची डाळ मिक्सर मधून बारीक करून घ्यावी. त्यात पाणी घालू नये. 
त्यानंतर एका कढई मध्ये तेल गरम करून त्यात आलं लसूण पेस्ट घालावी. 
जिरे पावडर, धने पावडर, बडीशोप पावडर ,लिंबाचा रस घालून नीट मिक्स करून घ्यावे.
 व त्यात चवीनुसार मीठ व तिखट घालून डाळ घालावी. व हे मिश्रण नीट परतून घ्यावे. 
हे मिश्रण (सारण)चांगले परतले कि एका बाॅउल मध्ये काढून घ्यावे. 
आता कणकेचे लिंबाच्या आकाराचे गोळे तयार करावेत.
त्यात मुग डाळीचे बनवलेले सारण भरावे. व त्याला नीट पॅक करून घ्यावे. 
त्यानंतर त्याला हाताने हलकासा दाब देऊन पसरून घ्यावे. अशा प्रकारे सर्व कचोरी बनवून घ्याव्यात. 
एका पसरट कढईत तेल गरम करत ठेवावे. व मध्यम आचेवर कचोरी तळून घ्याव्यात.


टिप:काजू कतली रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/05/kaju-katalirecipe-in-marathi.html




Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 


Comments

Popular Posts