इमरती (imarati)recipe in marathi
इमरती (imarati)रेसिपी |
साहित्य:
1वाटी उडीद डाळ,
दिड वाटी साखर,
दिड कप पाणी,
1/2लहान चमचा इलायची पावडर,
चिमुटभर ऑरेज कलर,
कॅरीबॅग किंवा साॅसची बाॅटल(इमरतीचा आकार देण्यासाठी)
कृती:
कृती:
एक वाटी उडीद डाळ स्वच्छ धुवून घ्यावी. डाळ रात्रभर भिजत ठेवावी.सकाळी डाळ पाण्यातून काढून घ्यावी. व मिक्सर मधून काढून घ्यावी.
मिक्सर मधून काढून घेताने त्यात पाणी जास्त वापरू नये. कारण इमरती साठी बाॅटर घट्ट लागते.
बाॅटर बारीक काढून घेतल्यावर ते बाॅउल मध्ये काढून त्यात विलायची पावडर, ऑरेज कलर घालून हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. बाॅटर चांगले फेटून घ्यावे. हे बॅटर 5मिनिटे असेच ठेवावे.
त्या नंतर एका कॅरीबॅग मध्ये बाॅटर घालून कॅरी बॅगचा कोन बनवून त्याला वरून रबर लावावे.व कोनचे समोरील टोक कातरीने कापून घ्यावे.
एका पातेल्यात दिड कप पाणी व दिड कप साखर घालावी व एकतारी पाक बनवून घ्यावा. पाक बोटावर चिटकायला लागला.कि पाक तयार झाला असे समजावे.
एका पसरट कढईत तेल गरम करत ठेवावे.तेल गरम झाले कि त्यात इमरती बनवावी. (इमरतीचा आकार देताने दोन वेढे गोल घेऊन त्यावर छोटे छोटे गोल काढून आकार दयावा. )

ती खालून व वरून मध्यम आचेवर चांगली तळून घ्यावी.व पाक गरम असतानेच तयार इमरती त्यात सोडून 7-8मिनिटे ठेवून ती बाहेर काढून घ्यावी.
अशा प्रकारे आपली झटपट इमरती रेसिपी तयार आहे.
टिप:वाॅटर मिलन रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा.
https://aayubhagwat.blogspot.com/2020/05/blog-post_8.html
Zatpat recipes marathi नक्की subscribe करा.
Comments
Post a Comment
तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you