गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड (shrikhand)recipe in marathi

मराठी रेसिपी
श्रीखंड(shrikhand)recipe 
श्रीखंड हे लहान मुलांना खूपच आवडते.परंतु अनेक आईवडील  बाहेरील पदार्थ मुलांना देण्याचे टाळतात.घरीच कमी वेळात  झटपट श्रीखंड कसे बनवायचे ते बघूया.
 
साहित्य: 
150grm घट्ट दही 
1वाटी साखर(बारीक करून)
1/2चमचा विलायची पावडर
काजू, बदाम, पिस्ता याचे काप आवडीनुसार

कृती:
एका सुती कापडामध्ये दही बांधून ठेवा.
त्याला रात्रभर थोडयाशा उंची वर टागून ठेवावे. 
म्हणजे दहयातील सर्व पाणी बाहेर पडले.
घट्ट चक्का तयार होईल.
आता चक्का मध्ये बारीक केलेली साखर व विलायची पावडर घालून नीट मिक्स करून घ्यावे.
पुरण काढतो त्या चाळणीने किंवा इतर कोणत्याही बारीक चाळणीने हे मिश्रण चाळणीत टाकून वरून ताबयाचया किंवा ग्लासच्या साहाय्याने पुरण काढतो त्या प्रमाणे करून घ्यावे (घोटून घ्यावे).
सर्व घोटून झाल्यावर एका बाॅउल मध्ये काढून त्यात आवडीनुसार काजू, बदाम, पिस्ता घालावा. व 15-20मिनिटे थंड होण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवून सर्व्ह करावे.

टिप :
 1)शक्यतो श्रीखंड बनवताने ताजे दही वापरावे.
2)घरी केशर असल्यास ते घालावे त्याने रंग चांगला येतो.
3)साखरचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करता येते.
4)पुरण यंञातून काढून देखील श्रीखंड चांगले बनते.


पुरी: 

साहित्य: 
2वाटी गव्हाचे पीठ
1/2चमचा ओवा 
1चमचा तेलाचे मोहन 
चवीनुसार मीठ
तळण्यासाठी तेल 

कृती: 
एका ताटात पीठ चाळुन घ्यावे. 
त्यात ओवा,तेलाचे मोहन व मीठ घालून घट्ट कणीक मळवून घ्या. 
कणकेचे लिंबाच्या आकाराचे गोळे तयार करावेत.
लहान लहान गोलाकार पुरी लाटून घ्याव्यात. 
एका कढईत तेल गरम करत ठेवावे. 
ब्राऊन रंगावर पुरी तळून घ्यावात.

अशा प्रकारे आपली श्रीखंड पुरी रेसिपी तयार आहे. 
Recipe in marathi
Shrikand puri recipe 


 


टिप:लस्सी रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/05/blog-post_2.html




Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 

Comments

Popular Posts