लस्सी (lassi)recipe in marathi

मराठी रेसिपी
लस्सी(lassi)recipe 

लस्सी हे एक उनहाळयातील लोकप्रिय शीतपेय आहे. आज आपण झटपट घरीच लस्सी कशी बनवायची ते बघूयात.

साहित्य:
3कप दही (घट्ट),
1/2कप साखर,
1/2चमचा विलायची पावडर,
10-12बर्फाचे तुकडे,
1कप क्रिम(साय),
काजू-बदामाचे काप आवडीनुसार

कृती:
सर्व प्रथम दही व साखर एकञ करून घ्यावे.
 व मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण टाकून त्यात बर्फाचे तुकडे ,विलायची पावडर आणि थोडीशी क्रिम घालून फिरवून घ्यावे. नंतर एका ग्लास मध्ये ओतून त्यावर क्रिम घालावी.
 आणि काजू बदामाचे काप घालून सर्व्ह करावे.

टिप:
1) लस्सी साठी शक्यतो ताजे दही वापरावे.
2)यात केशर घातल्यास रंग व चव छान येते.
3)असेल तर पिस्ता घालावा.
4)दही घट्ट होण्यासाठी कोमट दुधात विरजण टाकावे.5-6 तासात घट्ट दही तयार होते.


टिप:बालूशाही रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/05/blog-post.html


बटर काॅच आइस्क्रीम रेसिपीसाठी खालील लिंक पहा.
https://aayubhagwat.blogspot.com/2021/05/butter-scotch-icecream-recipe-in-marathi.html

Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 



Comments

Post a Comment

तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you

Popular Posts