पालक पनीर (palak paneer) recipe in marathi
पालकांच्या भाजी मधून भरपूर प्रमाणात जीवनसत्वे मिळतात.परंतु लहान मुलांना पालकची भाजी खायला कंटाळा करतात.अशा वेळी पालक पनीर हा एक उत्तम पर्याय आहे.
साहित्य :
200ग्रॅम पनीर,
1जुडी पालक,
आलं लसूण पेस्ट,
एक लहान कांदा,
जिरे पूड, हळद,
1चमचा लाल तिखट,
1कप टोमॅटो प्युरी,
चवीनुसार मीठ व 2 मोठे चमचे पालक पनीर मसाला
टोमॅटो प्युरी:
1 मोठे टोमॅटो पाण्यात उकळून घ्या व त्याची सालं काढून मिक्सर मधून बारीक प्युरी करून घ्यावी.
कृती:
पालक चांगली धुऊन घ्या. पालक चिरून गरजेनुसार पाणी घालून पातेल्यात उकळून घ्या. व 5मिनिटे शिजवून घ्यावी. नंतर पालक मिक्सर मधून काढून घ्यावी.
पनीरचे तुकडे करून घ्यावे व ते तेलामध्ये पनीरचे तुकडे शालो फाॅय करून घ्यावे.
पनीरचे तुकडे करून घ्यावे व ते तेलामध्ये पनीरचे तुकडे शालो फाॅय करून घ्यावे.
व कढई मध्ये तेल गरम करून त्यात जिरे पूड घालून नंतर आलं लसूण पेस्ट घालावी .
नंतर कांदा घालून गुलाबी रंगावर परतुन घ्यावा. लाल तिखट व हळद मीठ घालावे. पालक पनीर मसाला एक कप दुधामध्ये चागला मिक्स करून कांदा गुलाबी झाल्यावर टाकावा व चांगले परतून घ्यावे.
त्यानंतर टोमॅटो प्युरी घालून नीट मिक्स करून घ्यावे व तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.
नंतर पालक व गरजेनुसार पाणी घालून एक उकळी आली कि त्यात पनीर घालावे व परत एक उकळी आली की गॅस बंद करावा.
अशा प्रकारे पालक पनीर तयार झाले.
टिप:
Comments
Post a Comment
तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you