घरच्या घरीच बनवा मार्केट सारखा पनीर (paneer recipe) recipe in marathi
साहित्य:
1लिटर दुध
1चमचा लिंबू सत्व
एक सुती कापड
कृती:
कृती:
एका जाड बुडाच्या पातेल्यात दुध उकळून घ्या.
त्यात एक चमचा लिंबू सत्व टाका.
त्यामुळे दुध फाटेल.
त्याला चमचाने हालवा.
थोडा वेळ गरम करून गॅस बंद करावा.
एका पातेल्यावर सुती कापड ठेवावे.
त्यात फाटलेले दुध टाकावे.
नंतर त्या कापडाची घडी घालून घ्यावी.
त्याला एका ताटात ठेवून दयावे.
त्यावर एक प्लेट ठेवून ओझे ठेवावे.
15मिनिटे तसेच ठेवावे.
नंतर घडी काढून घ्यावी.
पनीर काढून घ्यावे.
अशा प्रकारे तुम्ही घरीच पनीर बनवून शकता.
Comments
Post a Comment
तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you