मॅगो/आंबा (mango barfi) बर्फी recipe in marathi

साहित्य:
2आंबे(मॅगो), 
150ग्रॅम खवा(एकजीव केलेला),
1वाटी साखर(मिक्सर मधून बारीक करून),
4-5काजू बदाम तुकडे
                                                       
मराठी रेसिपी
मॅॅगो बर्फी(mango barfi)recipe 

कृती:
मॅगो बर्फी बनवताने आंबे  चांगले धुऊन घ्या आणि नंतर चाकूने चिरून त्यातील पुर्ण गर काढून घ्यावा. 
व मिक्सर मधून गर फिरवून घ्यावा.नंतर एका पॅन मध्ये तो गर टाकून साधारण 4-5मिनिटे मध्यम आचेवर ठेवून त्याला हलवत रहावे.
त्या नंतर त्यात साखर व खवा घालून नीट मिक्स करून घ्यावे.
साखर घातल्यामुळे हे मिश्रण थोडेसे पातळ होईल,त्यामुळे त्याला घट्ट होईपर्यंत हलवत राहावे. 
साधारणपणे 12-15मिनिटे हे मिश्रण घट्टसर होण्यास लागतात.मिश्रण जास्त घट्ट झाले कि त्याला एका डिश मध्ये तुप किंवा तेल लावून त्यात मिश्रण टाकावे.
 आपल्याला हव्या त्या आकाराच्या वड्या कापून घ्याव्यात.
अशा प्रकारे आपली झटपट मॅगो बर्फी रेसिपी तयार आहे. 

टिप:
1)  मॅगो बर्फी बनवताने शक्यतो खवा ताजा वापरावा.
2)आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करता येईल.


टिप:
फ्राईड करेला रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/04/blog-post_27.html

Comments

Popular Posts