फ्राईड करेला (fried karela)recipe in marathi
कार्ल्याची भाजी ही कडू होते म्हणून अनेक जण खात नाहीत. कारली जर कापताने त्याच्या सगळ्या बिया काढून घेतल्या तरव कारले चांगले उकडून घेतले तर कारले अजिबात कडू होत नाही.चला तर मग आज आपण फ्राईड करेला रेसिपी झटपट कशी बनवायची ते बघूया.
साहित्य:
साहित्य:
3-4 कारले(कवळी),
गरम मसाला(2चमचे फुल,
2चमचा धने,
2-3खोबरे तुकडे,
1चमचे खसखस,1तेजपतता),
थोडेसे शेंगदाणे,
1लहान चमचा लाल तिखट,
कोथींबीर,
आलं लसूण पेस्ट,
चवीनुसार मीठ,
5-6चमचेबेसन पीठ ,
तळण्यासाठी तेल
कारले धुऊन छोटे तुकडे करून वांगी चिरून घेतो त्याप्रमाणे चिरून घ्यावीत.(कारली चिरताना त्याच्या सर्व बिया काढून घ्याव्यात)
नंतर एका जाड बुडाचया पातेल्यात कारले, तेल व मीठ घालून चांगले उकडून घ्यावेत.नंतर फुल, धने,खोबरे, तेजपतता,खसखस,शेंगदाणे चांगले भाजून घ्यावे, व मिक्सर मधून काढून घ्यावे किंवा पाटयावर वाटून घ्यावे.
नंतर बेसन पीठ भजाला कालवून घेतो त्याप्रमाणे कालवून त्यात मीठ घालून बाजूला ठेवून द्यावे.आता उकडलेल्या सगळ्या कारलयात मसाला भरावा(वांग्याची भाजी बनवताना भरतो त्याप्रमाणे भरावे).
एका कढई मध्ये तेल गरम करून त्यात बेसन पिठामधे बुडवून मसाला भरवलेली कारली तेलात फ्राय करून घ्यावीत. सगळे कारले फ्राय झाले कि त्याला परत वरून गरम मसाला लावून परत तव्यावर थोडेसे तेल घालून फ्राय करावे.
गरमागरम पोळी सोबत सर्व्ह करावे.
टिप:
टिप:
1)फ्राईड करेला हे भजा प्रमाणे तसेही खाऊ शकतो.
2)कारले उकडून घेताने त्यात मीठ व तेलाचे प्रमाण थोडे जास्त ठेवावे. त्यामुळे ते चांगले उकडते .
2)कारले उकडून घेताने त्यात मीठ व तेलाचे प्रमाण थोडे जास्त ठेवावे. त्यामुळे ते चांगले उकडते .
टिप:कैरीची भाजी रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा.
https://aayubhagwat.blogspot.com/2020/04/blog-post_20.html
Comments
Post a Comment
तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you