दाल फ्राय (tur dal fry) recipe in marathi
नेहमी आपण हरभरा दाल मिक्स करून दाल फ्राय बनवतो.पण फक्त तुर डाळीचा दाल फ्राय खुप छान होतो. एखाद्या वेळी वरण भाताचा कुकर लावलेला असतो. व घरी अचानक पाहूणे येतात.आशा वेळी तुर दाल फ्राय हा एक उत्तम पर्याय आहे.आज आपण झटपट दाल फ्राय रेसिपी बनवूयात.
1कप तुर डाळ,
1टोमॅटो (बारीक चिरून),
1मध्यम आकाराचा कांदा(बारीक चिरून),
आलं लसूण पेस्ट,
2-3वाळलेल्या मिरच्या,
1लहान चमचा लाल तिखट,
1/2चमचा मोहरी,
1/2जिरे,
चवीनुसार मीठ,
हळद,
कढीपत्ता,
कोथींबीर व 2चमचे तेल.
कृती:
तुरीची डाळ कुकर मध्ये पाणी घालून चांगली शिजवून घ्यावी.व तिला हलक्या हाताने घोटून घ्यावे. खुप घोटून घेऊ नये.
त्या नंतर कढईत तेल गरम करत ठेवावे. त्यात मोहरी घालून नीट तडकलयावर जिरे घालावे व त्यात कांदा घालावा, कांदा थोडासा ब्राऊन रंगाचा झाला कि त्यात आलं लसूण पेस्ट घालावी.
चांगले ब्राऊन रंगावर तळून घेतलेवर त्यात टोमॅटो टाकुन चांगले परतून घ्यावे व त्यात लाल तिखट व मीठ घालून नंतर कढीपत्ता व थोडी कोथींबीर घालावी.
नंतर घोटलेली डाळ त्यात घालून पाणी घालावे. पाणी खुप घालू नये,कारण दाल फ्राय हा थोडासा घट्टच असतो. त्यामुळे पाणी गरजेनुसार घालावे व उकळी येऊ द्यावी.
नंतर एका पातेल्यात 1चमचा तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे तडकून झाल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट घालावी व लाल मिरची टाकून फोडणी तयार करून डाळी वर टाकावे.व वरून कोथिंबीर टाकून गरमागरम सर्व्ह करावे.
टिप:
1)दाल फ्राय बनवताने दाल थोडी घट्ट ठेवावी.
2)यात जर टोमॅटो प्युरी टाकली तर चव छान येते.
2)यात जर टोमॅटो प्युरी टाकली तर चव छान येते.
टिप:आप्पे रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा.
https://aayubhagwat.blogspot.com/2020/04/blog-post_22.html
Zatpat recipes marathi नक्की subscribe करा.
Nice di
ReplyDeleteThank you dear
DeleteMast.....
ReplyDelete