लेकीची काळजी

आज महेशला सुट्टी असल्याने सुधाने मस्त आमरसाचा बेत आखला होता. ती स्वयंपाक बनवत असताने अचानकच चक्कर येऊन खाली पडते. ती आताच चांगली होती आणि आता काय झाले हिला या विचारानेच महेश घाबरून जातो.व क्षणाचाही विलंब न करता तिला तातडीने दवाखान्यात घेऊन जातो.ती बेशुद्ध असते.डाॅकटर त्याला बाहेर बसायला सांगतात. तिचे चेकप सुरू असते. तो बाहेर विचार करत बसलेला असतो. सुधाला काही झाले तर काय उत्तर दयायचं हिच्या आईवडिलांना, भाऊ बहिणींना. आणि अचानकच त्याला मागचे सगळे आठवायला लागते.
16 वर्ष होऊन गेले लग्नाला. घरची परिस्थिती ही जेमतेमच. सुधा ही समंजस व हुशार असल्याने ती सगळे ॲडजसट करून घ्यायची. पण आपल्याला मुल नाही याची खंत तिला नेहमी सतवायची. आपली आई तर नेहमीच तिला मुल नाही म्हणून नको नको ते बोलायची. मी माञ घरची परिस्थिती बेताचीच असल्या कारणाने नेहमी सुधालास शांत रहा,एकून घेण्याचं सागायचो. ती माञ निमूटपणे सगळे सहन करायची. घरातली सगळी कामं आपुलकीने करायची. 
सगळ्याची काळजी घ्यायची. परंतु मुल नाही म्हणून तिला लोक हिनवायचे. वाझोटी, वांझ असे शब्द तिला ऐकावे लागायचे. ती चुपचाप सगळं सहन करायची.कितीतरी राञी तिने रडून काढलेल्या.माझी किती काळजी घेते ती मी माञ तिच्यासाठी काहीच करू शकलो नाही.
माझ्या बहिणीची डोहाळे जेवणाची तयारी किती हौसेने केली होती सुधाने. सजावटी पासून, जेवणापर्यंत सगळे तिने एकटीनेच तर केले होते. ऐवढे करून ही कार्यक्रमाला आलेल्या बाया या वाझोटीला कशाला येऊ दिलं इथे, बाहेर काढून दया.असे कितीतरी बोलणे ऐकत ती निमुटपणे सहन करायची फक्त माझ्यासाठी.आपली आई पण खुप ञास देते.दिदीला मुलगा झालेवर दिदी कशी आई जवळ त्याचे कौतुक सांगायची आणि आई कशी तिला नको नको ते बोलायची असे सगळे त्याला आठवत होते.
तो विचारांच्या गर्तेत असतानाच नर्स त्याच्या हातात सुधाचे रिपोर्ट देते व डॉक्टराने आत बोलावले असे सांगून निघून जाते.तो भानावर येतो व आत जातो.
डॉक्टर साहेब लवकर सांगा काय झाले माझ्या सुधाला ती बरी आहे ना?असे अनेक प्रश्न विचारतो.डॉक्टर त्याला शांत रहा. ती चांगली आहे.तिला बाळ होणार आहे ,आता तुम्हाला अधिक काळजी घ्यावी लागेल. त्याचा त्याच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो खुप खुश झाला. आणि पळतच तिच्याकडे गेला.ती हळूहळू शुद्धीवर येत होती.पुर्ण शुद्धीवर आल्यावर ती त्याला विचारते काय झाले होते मला. त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत असतात.तो तिला सांगतो आपल्याला बाळ होणार आहे.
हे ऐकून तिला काहीच सुचत नाही. 16वर्षानी आपल्याला बाळ होणार आहे, खर आहे ना  हे कस शक्य आहे. अग देवाने आपलं ऐकले. आपण आईबाबा होणार आहोत. दोघांचा ही आनंद ओसंडून वाहत होता. दोघेही घरी येतात. व आईवडिलांना ही गोड बातमी देतात. ते ही फार खुश होतात.एक चिमुकला जीव घरात येणार म्हणू न सगळे आनंदात असतात. पण हा आनंद फार काळ टिकून रहात नाही. महेशची आई याच त्याच ऐकून मुलगाच हवा असा हट्ट धरते.
सुधा व महेश यांना काही का असेना 16वर्षानी बाळ होणार हेच महत्त्वाचे वाटते.आणि एका दिवशी तिची सासू बळजबरीने तिला गरभ निदान करायला घेऊन जाते.सुधाने महेशला फोन करून याची कल्पना दिलेली असते. तो तात्कळ दवाखाना गाठतो.तो पर्यत तिचे रिपोर्ट आलेला असतो. मुलगी होणार हे ऐकल्यावर तिची सासू ही मुलगी माझ्या घरात नको मला वंशाला दिवा हवा असं म्हणते. तेव्हा महेश व सुधा तिला खुप समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात पण ती काही ऐकत नाही. मला नातूच हवा असा हट्ट धरते. हे बघून महेशचा पारा चढला. तो म्हणतो आजवर मी कधी काही बोललो नाही नेहमी सुधालाच समजून घ्यायला लावले.पण आता जास्त होतये. 
आमच्या आयुष्यात एवढ्या वर्षांनी सुख येतये. यात तु खुश होण्यऐवजी ते सुखच  हिरावन घ्यायला निघालीस. माझ्या अजून जन्माला न आलेल्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करण्याअगोदर तु पण एक मुलगी आहेस हे कस विसरून गेलीस तू.मुलगी असो वा मुलगा आम्हांला काही फरक पडत नाही.मी माझ्या मुलीचे प्रत्येक हौस पुर्ण करेन.जिथे माझी मुलगी जन्माला येण्याआधी तिला मारायचा प्रयत्न केला जातो अशा वातावरणात मला तिला वाढवायचा नाही. आम्ही आता कायम वेगळे राहणार असे सांगून तो सुधाला घेऊन तेथून निघून जातो.
"प्रत्येक यशस्वी मुलींच्या मागे तिच्या बापाचा हात असतो, जो तिच्यावर विश्वास ठेवतो लोकांवर नाही. "




Pls subscribe Zatpat recipes marathi. 
 
टिप:वासना कथा खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/04/blog-post_21.html

Comments

Popular Posts