कैरीची भाजी ( kairi bhaji) in marathi
कैरी ही प्रत्येकालाच आवडते.कैरीचे अनेक पदार्थ बनवले जातात. त्यातीलच एक किसलेल्या कैरीची भाजी झटपट कशी करतात हे आपण बघूयात.
साहित्य:
1कैरी,
1कांदा(बारीक चिरलेला),
4-5चमचे मुग डाळ10-15मिनिटे भिजवावे),
मोहरी,
जिरे,
आलं लसूण पेस्ट,
लाल तिखट व मीठ चवीनुसार,
हळद ,कोथींबीर,
2चमचे तेल.
कृती:
सर्व प्रथम कैरी स्वच्छ धुवून घ्यावी. व नंतर किसनीने किसून घ्यावी .
कढईत तेल गरम करत ठेवावे व त्यात मोहरी व जिरे घालून तडकून झाल्यावर कांदा घालावा व लाल झाले वर त्यात लाल तिखट,हळद व मीठ घालून फ्राय करावे.
नंतर त्यात भिजवलेली मुग डाळ व किसलेली कैरी घालून 5मिनिटे चांगले परतून घ्यावे व वरून कोथींबीर घालावी. अशा प्रकारे कैरीची भाजी तयार.
टिप:
1)तुमच्या आवडीनुसार चिंच किंवा गुळ देखील घालू शकता.
2) कैरी आंबट असेल तर तिला किसून घेतलेवर तिला पाण्यने धुऊन घ्यावे. व नंतर पाणी काढून घ्यावे.
2) कैरी आंबट असेल तर तिला किसून घेतलेवर तिला पाण्यने धुऊन घ्यावे. व नंतर पाणी काढून घ्यावे.
टिप:दाल फ्राय रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा.
https://aayubhagwat.blogspot.com/2020/04/blog-post_25.html
Zatpat recipes marathi नक्की subscribe करा.
Mast ahe 👌👌
ReplyDelete