कैसा ये रिश्ता? भाग 1

रिषभ खुप लहान असतो. तेव्हा त्याचे पप्पा त्याला खुप दाखवतात.पण ते त्याच्यावर खुप प्रेम करत असतात. तो लहान असल्याने त्याला कळत नाही ते का रागावले होते. त्याला वाटायला लागलं की पप्पा माझ्यावर प्रेम करत नाहीत. आणि तो घर सोडून निघून जातो.तो घर सोडून निघून जाताना घरातुन काहीच घेऊन जात नाही. तो खुप लाडात वाढलेला असतो. इकडे त्याच्या मम्मी-पप्पांना समजते तो घर सोडून निघून गेला आहे.ते खुप शोधाशोध करतात. पण रिषभ कुठेच सापडत नाही. त्याचे पप्पा बिझनेस मॅन असल्याने त्याच्या ओळखीने ते खुप प्रयत्न करतात.पण काहीच उपयोग होत नाही. रिषभ कुठेच सापडत नाही.
इकडे रिषभ घर सोडून गेले वर त्याला कुठे जायचे,काय करायचे, काहीच कळत नाही तो कसा तरी दिवस काढत असतो. त्याला या सगळ्याची सवय नसते. तरीही तो घरी परत जात नाही. रस्त्यावर झोपणे,कुणी काही दिले तर तेवढेच खाणे हे सगळे सुरू असते. त्याला मम्मीची, आजीची, त्याच्या भावाबहिणीची आठवण येते. एका दिवशी रिषभ बसस्थानक वर बसलेला असतो तेव्हा त्याला एक अनोळखी काका विचारतात,बाळा तुझे नाव काय?तु कुठे राहातोस?तु एकटा कसा, तुझे मम्मी पप्पा कुठे आहेत? तो सांगतो मला कुणीही नाही मी एकटाच रहातो.तेव्हा ते त्याला त्याच्या सोबत घेऊन जातात. ते एका अनाथ आश्रमाचे मालक असतात.आता रिषभला रहायला जागा व जेवणाची सोय होते.
रिषभ आता तिथल्या मुलासोबत चांगलाच रमून जातो. सगळे मिळून मिसळून रहातात.सोबत अभ्यास करतात.सोबत खेळतात.तिथे काम करणे त्याला आवडू लागते. घरी असताना पाणी ही हातात मिळणारा तो आता सगळे काम शिकला होता.त्याला घरची खुप आठवण यायची. तो एकटाच रडत बसायचा. हळूहळू त्याला या सगळ्याची सवय होते.व तो आश्रमात चांगलाच रमून जातो.
इकडे त्याचे पप्पा त्याला शोधुन शोधुन परेशान होतात.त्याना वाटते आपण त्याला रागवायला नको होते. माझ्या मुळे तो घर सोडून निघून गेला. पण आता वाईट वाटुन उपयोग नसतो. त्याच्या आजी तो गेल्यापासून आजारी पडतात. सारखी त्याची आठवण काढतात. मम्मी रडून रडून अस्वथ असते.एवढा पैसा असतो पण घरातील मुलगा नसल्याने तो ही नकोसा वाटायला लागतो. त्याच्या आजी अनेक आश्रमा ना देणगी देत असतात.त्यात रिषभ रहातो ते आश्रमही असते.पण त्याना हे माहितच नसते कि येथे आपला नातू ही रहातो. असेच काही वर्ष निघून जातात.
रिषभ नोकरी शोधण्यासाठी पुण्याला जातो.तिथे गेल्यावर त्याला एक मुलगी भेटते. तिच्या राहणीमावरून ती खुप श्रीमंत वाटतं असते. रिषभ तिला त्याला जायचे असते तिथला पत्ता विचारतो.तिला तो सुशिक्षित दिसतो.तिला वाटते तो असेच विचारतोये म्हणून ती त्याला चुकीच्या जागेवर पाठवते. त्याला तिच्या पप्पांचया ऑफिसमध्ये इटरवहूसाठी जायचे असते. ती चुकीची माहिती देते त्यामुळे त्याला पोहचला वेळ लागतो. तो हुशार असतो त्यामुळे त्याला तो जाॅब मिळतो.परत दुसर्या दिवशी त्याला ती मुलगी रस्त्यावर भेटते. तेव्हा तो तिला विचारतो तु मला चुकीच्या पत्ता वर का पाठवले. तुझ्यामुळे माझी किती परेशानी झाली.आणि दोघेही खुप भांडणं करतात.
                                          क्रमशः 


टिप:पनीर रेसिपीसाठी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/04/blog-post_52.html

कैसा ये रिश्ता भाग 2कथा खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/04/2_18.html

कैसा ये रिश्ता भाग 3कथा खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/04/3_20.html

कैसा ये रिश्ता भाग 4 कथा खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/04/4.html



Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 

Comments

Popular Posts