पहिले प्रेम भाग 2

 निशानला माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे असं सांगीतल्या वर तो थोडा वेळ तसाच थांबतो. व निशाला काहीही न बोलता निघून जातो.तिला तो असा का निघून गेला हे कळत नाही. तो तिला नेहमी मदत करत असतो.तिला भावनिक आधार देत असतो. यावरून तिला वाटतं होते कि त्याला देखील ती आवडते.पण तो उत्तर न देताच गेल्यामुळे ती बराच वेळ तिथेच बसते व नंतर घरी निघून जाते.निशा त्या नंतर 7-8दिवस कॉलेज मध्ये जात नाही ती कॉलेज मध्ये येत नाही हे बघून निशान तिला काॅल करतो व विचारतो. तु कॉलेजला का येत नाहीये. ती सांगते असेच येत नाही माझी इच्छा नाहीये सध्या येण्याची. तो तिला बराच वेळ समजावतो. शेवटी ती यायला तयार होते.दुसर्या दिवशी ती तिच्या पप्पांना भेटायला दवाखानामध्ये जाते व नंतर काॅलेजला जाते. काॅलेज आता काही दिवस राहणार होते. त्या मुळे ती सगळ्यांना भेटते.तिचे सबमिशन्स करते. व नंतर ती निशानला भेटते. दोघेही बराच वेळ बोलतात. नंतर निघताने परत ती त्याला माझ्या प्रश्नांचे उत्तर दे, तु नाही म्हणाला तरी चालेल पण काही तरी सांग मला अस ती म्हणते. तो तिला सांगतो आपण खुप चांगले मित्र आहोत.मला थोडा वेळ दे. ती त्याला म्हणते मी तुझी वाट पाहीन आणि घरी निघून जाते.
काही दिवस झाल्यावर पेपर सुरू होतात. दोघेही हुशार असतात त्यामुळे त्याना सगळे पेपर छान जातात. पेपर संपले व काॅलेज ही संपते. आता ते भेटणार नसतात. निशा त्याच्या उत्तराची वाट पाहत असते.याच दरम्यान तिच्या पप्पांची तब्येत खुप खराब होते. त्याना घरी आणलयामुळे तिच्या घरी पप्पांना भेटायला पाहूणे सुरू असतात.तिचा सगळा वेळ पप्पांची काळजी घेण्यात निघून जात असतो.ती कधीतरी निशानला फोनवर बोलत असे.तिला वडीलांची खुप काळजी वाटायची. तिला माहीत होते आपले पापा आपल्याला लवकरच सोडून जाणार आहेत. त्यामुळे ती जास्तीत जास्त वेळ वडिलांन सोबत असायची.
एका दिवशी निशा तिच्या पप्पांना खाऊ घालत होती.अचानकच त्याना ञास व्हायला लागतो.ती तिच्या आईला बोलावे पर्यत तिचे वडील त्याना सोडून निघून जातात. तिच्या वर दुखाचा सागर कोसळतो. वडिलांचा मृत्यू झाल्यावर तिला दुखातुन बाहेर यायला बरेच दिवस लागतात.काही महिने गेलेवर तिची आई तिच्या लग्नाचा विषय सुरू करते.1वर्षात लग्न नाही झाले तर पुढे 3वर्ष लग्न करता येत नाही म्हणून ततिच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात होते. निशा आता ही निशानची वाट पाहत असते. एका दिवशी तिला बघायला एक मुलगा येतो. त्याला ती आवडते. तो तिला विचारतो तुला तुझ्या इच्छा पूर्ण करायला आवडतील कि माझ्या ती त्याला म्हणते "मला एकमेकांच्या साथीने एकमेकांच्या इच्छा पूर्ण करायला आवडतील. " हे उत्तर त्याला खुप आवडते.तो तिला होकार देतो.लग्नाची तारीख काढतात. सगळी खरेदी होते. तिची आई कोणतीही कमी ठेवत नाही.
एका दिवशी निशान तिला काॅल करतो व म्हणतो मला तुला भेटायचं आहे. ती त्या ला सांगते माझं लग्न ठरलं आहे आता मी तुला नाही भेटू शकत. तो खुप फोर्स करतो तेव्हा ती  त्याला भेटायला जाते.भेटले नंतर तो तिला म्हणतो तु माझ्याशी लग्न करशील का ती म्हणते तु खुप उशीर केलास आता माझं लग्न ठरलं आहे आता काही होऊ शकत नाही. मी तुझी खुप वाट पाहीली तु तेव्हा काहीच बोलला नाहीस अस का?तो तिला सांगतो मी तुला पहील्या दिवशी भेटलो तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो होतो. पण माझ्या वडीलांना प्रेम विवाह मान्य नाही त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करतो हे तुला कधीच सांगू शकलो नाही. मला माफ कर आपण पळून जाऊन लग्न करू मला तु हवी आहेस. तिला ही हेच हव होत एवढे दिवस पण आता ती तिच्या आईचा विचार करून त्याला नाही म्हणून सांगते व आईने ठरवलेल्या मुलाशी लग्न करते.तिचे लग्न झाले यातून नैराश्य येऊन तो आत्महत्या करतो. निशा माहेरी आल्यावर तिच्या मैत्रिणी कडे जाते. तेव्हा निशानने आत्महत्या केल्याचे तिच्याकडून तिला समजते. ती घरी यायला पायीच निघते. तिच्या डोक्यात असंख्य विचार असतात.आपण तेव्हा त्याला हो म्हणालो असतो तर आज तो जिवंत असता, आपल्यामुळेच तो हे जग सोडून गेला. असे विचार सुरू असतानेच ती गाडी समोर येते. तिला खुप मार लागलेला असतो.आणि ती तेथेच शेवटचा श्वास घेते.


टिप:पहिले प्रेम भाग 1कथा वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/04/blog-post_16.html



Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 

Comments