पहिले प्रेम भाग 1

निशा ही दिसायला सुंदर आणि धाडसी होती. ती तिच्या वडीलांची खुप लाडकी होती. ते तिला हव तसं सगळं करायचे.निशाचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला हव्या असलेल्या कॉलेज मध्ये वडिलांनी प्रवेश घेऊन दिला. अभ्यास व प्रोजेक्ट पूर्ण करणे यात तिचा पूर्ण वेळ जात होता.ती एक हुशार व मेहनती मुलगी असते. घरची परिस्थिती ही चांगली असते त्यामुळे तिला हवं ते सगळं मिळतं असे.काही दिवसांनी तिच्या कॉलेज मध्ये एक नवीन मुलगा अडमिशन घेतो. त्याचे नाव निशान असते. निशान हा खुप हुशार असतो. तो हुशार असल्यामुळे लवकरच कॉलेज मध्ये सगळ्यासोबत मिक्स होतो.त्याला कमी बोलायची सवय असते. निशाला माञ तो खुप आवडतो.
निशा काही ना काही कारण सांगून निशानला बोलण्यचा प्रयत्न करायची. तो माञ तिला कामापुरतेच बोलायचा.एकदा क्लास मध्ये प्रोजेक्ट पूर्ण करणे सुरू असते. निशा तिची बुक घरीच विसरून येते. हे निशानला समजले तेव्हा तो दुकानात जाऊन तिच्यासाठी नवीन बुक घेऊन येतो. व तिला देतो.निशाला तो जास्तच आवडायला लागतो. ती त्याच्या सोबत मैञी करते. आता दोघेही खुप चांगले मित्र बनतात. एकञ अभ्यास करणे, प्रोजेक्ट सोबत करणे यामुळे त्याचे सुरू असते. जास्त वेळ एकमेकांच्या सोबत घालवत असतानेच निशा त्याच्या प्रेमात पडते. ती तिच्या एका मैत्रिणीला सांगते. मला निशान खुप आवडतो. तेव्हा तिची मैत्रीण तिला सांगते तो खुप चागला आहे. सगळ्याना मदत करतो. निशाला त्याला  सांगायचे असते. माझे तुझ्यावर प्रेम आहे. पण ती त्याला सांगण्याचा प्रयत्न करते तेव्हा कुणी ना कुणी येते त्यामुळे ती सांगु शकत नाही.
काही महिने असेच निघून जातात आणि एका दिवशी निशाचे वडील आजारी पडतात.त्याना काय झाले हे लवकर लक्षात येत नाही. त्यामुळे निशाचा सगळा वेळ त्याची काळजी घेण्यात व अभ्यासात जातो.काही दिवस उलटून गेल्यावर समजले की तिच्या वडिलांना कॅन्सर झाला आहे. हे एकून निशा व तिच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. असे काही होईल असा स्वप्नातही वाटले नव्हते. निशा तर हादरून जाते.या काळात निशान तिला भावनिक व मानसिक आधार देतो.ती तिच्या आई वडीलांची एकुनती एक असल्यामुळे ती जास्तीत जास्त वेळ वडिलांना देते. वडिलांचा दवाखाना, तिचा अभ्यास, घर यात वेळ कसा जातो हेच तिला कळत नव्हत.हे सगळे तिच्या आयुष्यात सुरू असताना निशा एका दिवशी कॉलेज मध्ये निशानला प्रपोज करते.
                                       क्रमशः 


टिप:पालक पनीर रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/04/blog-post_71.html

पहिले प्रेम भाग 2कथा वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 


Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 

Comments

Popular Posts