तिची व्यथा

10-12 वर्षाची आरूषी खुपच शांत असते. लहान मुले करतात तसे हट्ट ही ती करत असते तिच्या  आजोबाची खुपच लाडकी असते. घरची परिस्थिती ही चांगली असते. पण म्हणतात ना सगळ चांगले असले कि काही ना काहीतरी वाईट घडते. तसेच आरूषीच्या आयुष्यात ही घडायला लागते.

 तिला तिच्या बाजूला राहणारा एक मुलगा ञास द्यायाला लागतो. ती एवढी लहान असते की तिला काही लक्षात येत नाही. हळू हळू तिला कळायला लागते तो मुलगा काय करतो आहे ते .तो तिला तु जर तुझ्या आई वडिलांना सांगितलं तर मी तुला खुप मारेल अशी धमकी देतो त्यामुळे ती घरी कुणाला काहीच सांगत नाही. ती नेहमी घाबरल्यासारखी रहायला लागली.तिला तो मुलगा खुप ञास द्यायचा त्या मुळे ती खुपच हट्ट करू लागली लहान आहे म्हणून करतीये असते तिच्या घरच्याना वाटायचं. या सगळ्या प्रकारात तिला मुलाची खुप चिड यायची ,रागही यायचा.
 तिला असं वाटायला लागलं की सगळी मुले सारखीच असतात. ती कोणत्या ही मुलाला बोलायची नाही. एखाद्या मुलाला बोलली तरी रागातच बोलायची. त्यामुळे तिला शाळेत कोणताही मुलगा बोलायचा नाही. तिला 2-3 मैञिणी होत्या. ति कुणाला बोलायची नाही, कुणाशी खेळायची नाही.ती नेहमी एकटीच रहायची.दिवसामागून दिवस जात होते ती मोठी होत होती. शाळा, अभ्यास यात मन रमवून घेत होती आणि एका दिवशी तिच्या घरी तिचा एक नातेवाईक काही दिवसासाठी रहायला येतो. आरूषी सुरवातीला त्या मुलाला बाजूला राहणार मुलासारखे समजायची ती त्याला बोलायची नाही किंवा भांडायची कारण तो  तिला तिच्या घरात नको होता. काही दिवस झाल्यावर तिला समजले की प्रशांत त्या मुलासारखा नाहीये तो चांगला आहे. ती प्रशांत बोलू लागली नंतर आरूषी व प्रशांत खुप चांगले मित्र बनतात. काही दिवस झाल्यावर प्रशांत परत जातो. आरूषीचा शाळेचा रिझल्ट चांगला लागल्यामुळे तिला तिचे आजोबा जिल्ह्यातील  कॉलेजला ठेवतात. सगळे नवीन असल्याने आरूषीला तिथे करमत नाही हळूहळू अभ्यासात ती बिझी होउन जाते. एक दिवस प्रशांत तिला भेटतो. त्यानंतर ते कधी तरी फोन वर बोलायचे. नंतर ते रोजच्या रोज एकमेकांना बोलायचे ते दोघे खुप चांगले मित्र बनले होते.
एकदा आरूषी प्रशांतला सहज विचारते,तुझी कुणी गर्लफ्रेड आहे का? प्रशांत तिला सांगतो हो आहे. मग ती त्याला त्याच्या गर्लफ्रेडच नाव विचारते. तो तिला सांगत नाही ती परत म्हणते ये सांग ना रे मी कुणाला नाही सांगणार तेव्हा प्रशांत तिला सांगतो माझ्या गर्लफ्रेडच नाव आरूषी आहे. तिला खुप आश्चर्य वाटते. ती त्याला विचारते मी माझ्यात असते काय आहे. मी चागली नाहीये, तो तिला सांगतो तु खुप चांगली आहेस.तिला ही तो मिञ म्हणून आवडतच असतो. नंतर आरूषी प्रशांतला त्या मुलाविषयी सगळे सांगते. आणि त्याला विचारते आता मी तुला आवडते का ते सांग. प्रशांत हो म्हणतो तु तरीही मला आवडतेस त्यात तुझी काहीच चुकी नाहीये तु अगोदरच संगळ विसरून जा माझा तुझ्यावर विश्वास आहे. हे एकून आरूषीला समजत प्रशांत खुप चांगला मुलगा आहे.तिही त्याला हो म्हणते.ते दोघेही एकमेकांवर खुप प्रेम करतात.
आरूषी प्रशांत सोबत संगळ शेअर करायची.प्रशांत तिच सगळे ऐकायचा. ती त्याला काही करू नको म्हणाली तर तो नाही करायचा.या त्याच्या स्वभावाचा ती आणखीच त्याच्या प्रेमात पडली. दोघेही एकमेकांना समजून घ्यायला लागले. दोघांचेही शिक्षण पूर्ण होत आले होते. आणि आरूषीच्या घरी तिच्या लग्नाचा विषय सुरू झाला.

                                                              क्रमशः

टिप: तिची व्यथा भाग 2 वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/04/2.html
 
तिची व्यथा भाग 3कथा वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/04/3.html



Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 

Comments

Post a Comment

तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you

Popular Posts