कैसा ये रिश्ता भाग 4

रिषभ व रियाच्या लग्नाचे कार्यक्रम मोठया उत्साहाने सुरू होतात.सगळे नातेवाईक संगीताच्या कार्यक्रमापासूनच घरी येतात.सगळे खुपच उत्साहात असतात.सगळी खरेदी मोठया हौसेने केली जाते. शेवटी लग्नाचा दिवस जवळ येतो.हळदी समारंभ पार पडतो. रिया व रिषभ हे सगळं इनजाय करतात.लग्नाचा दिवस उजाडतो मोठे मोठे व्यवसायिक, सिनेतारका वधूवराला आशिर्वाद देण्यासाठी येतात. आणि मोठया थाटामाटात लग्न सोहळा पार पडतो.रिया व रिषभ खुप खुश असतात. रिया पहील्यादाच रिषभच घर बघते. तिच्या घरापेक्षा खुप मोठे असते. काही दिवसातच ती त्या घरात लवकरच सेटल होते. त्याच्या घरातील काही रिवाज वेगळे असतात.त्यामुळे तिला सुरूवातीला खूप अवघड जाते.पण तो तिला नेहमी मदत करत असतो व तिच्यावर खूप प्रेम करत असतो त्यामुळे तिला हे सगळं सोपे जाते.
दोघेही एकमेकांना समजून घेतात.प्रेमाने रहातात.रिषभ तिला नेहमी तिच्यावर विश्वास ठेऊन तिला पाठींबा देत असतो. ती एक स्वतञ विचार करणारी असते.तसेच तिला खोटं व चुकीचे वागणे अजिबात आवडत नाही.हा तिचा स्वभाव त्याच्या आजीला फारसा आवडत नसतो.पण नातू परत घर सोडून निघून जाईल या भीतीने त्या तिला काही म्हणत नाहीत.एकंदरीत सगळे नीट सुरू असते.एकदा रिषभचा लहान भाऊ एका मुलीची छेड काढतो.ती मुलगी खुप गरीब पण स्वाभिमानी असते. ती घरी येऊन रिषभचा घरच्यांना सगळे सांगते. पण कुणीही तिच्या वर विश्वास ठेवत नाही उलट तिला शांत रहायला सांगतात. रिया सगळी परिस्थिती समजून घेते. व ती मुलगी खरे बोलतीये हे समजताच ती तिच्या बाजूने उभे राहते.घरचे तिला विरोध करतात.एरवी तिला मदत करणारा रिषभ ही तिला समजून घेत नाही. तो ही त्याच्या भावाची साईट घेतो.तरीही ती त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष सुरू ठेवते.तिला रिषभचे घर सोडून निघून जावे लागते. ती तिच्या मम्मी पप्पांचया घरी राहायला जाते.एकमेकांवर प्रेम करणारे ते वेगळे रहायला लागतात.याचे दोघांनाही वाईट वाटत. पण परिस्थितीच तशी असते. रिषभ त्याच्या भावाला सोबत उभा असतो तर रिया सत्याचा बाजूने उभी असते. माञ दोघांचेही प्रेम कमी होत नाही. लवकरच रिषभला त्याची चुक समजते व तो रिया ला त्या मुलीला मदत करणयास मदत करतो.ते दोघेही परत एकञ येतात व घरच्याना देखील खुप समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात.आणि त्याना ही समजते ते त्या मुलीला न्याय मिळवून देतात.व त्याच्या भावाला शिक्षा करतात.रिया ही स्वत हा सोबत इतरांचीही विचार करते हे सगळ्यांना समजते.आणि सगळे तिचा जास्त लाड करायला लागतात.सगळे तिच्या विरोधात असतात तेव्हा ती एकटीच लढते याचा रिषभला खुप अभिमान वाटतो. अशा अनेक संकटाला ते एकमेकांच्या सोबतीने तोंड देतात.व यातून त्याचे नाते हे बहरतच जाते.आणि हे बंध अधिकाधिक घट्ट होतात.

टिप:कैसा ये रिश्ता भाग 2कथा  खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/04/2_18.html

कैसा ये रिश्ता भाग 3कथा खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/04/3_20.html

कैसा ये रिश्ता भाग 4 कथा खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/04/4.html



Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 

Comments

Popular Posts