तिची व्यथा भाग 3

आरूषी प्रशांतला परत विचारते तु त्या मुलीला एवढा महत्त्व का देतोस जर तुला ती आवडत नाही तर तु तिला तुझ्यापासून दूर रहायला का सांगत नाहीस. तो तिला परत रागवतो व सांगतो ती मुलगीच माझ्या जवळ येते. हे फोटो माझ्या मिञाने काढून मला पाठवले. त्या मुलीला प्रत्येकाच्या मध्ये मध्ये करण्याची सवय आहे. ती फक्त माझ्या ऑफिस मध्ये काम करते.या व्यतिरिक्त आमच्या मध्ये काहीही नाही. आरूषी प्रशांतला काहीच बोलत नाही. नंतर ती प्रशांतला न सांगता त्या मुलाविषयी सगळी माहिती मिळवते. तेव्हा तिला समजले की प्रशांत जे सांगत होता ते खरं होतं. ति मुलगीच प्रशांत मागे लागलेली असते. आरूषीला मुले मुलीच आयुष्य खराब करतात परंतु काही मुली देखील अशा असतात. हे नव्यानेच कळते. तिला या सगळ्याचा खुप राग येतो.पण परिस्थिती समोर ती हतबल झालेली असते.
दिवसामागून दिवस जात होते चिमुकली अवनी आता मोठी होत होती. आपले पप्पा मम्मीला मारतात तिला ओरडतात हे तिला कळायला लागले होते. ती विचारायला लागली होती पापा तुला का मारतात. तु पण मार ना पप्पाला. आरूषी माञ अवनीला सांगायची असे बोलत नसतात. तुझे पप्पा खुप चांगले आहेत. ते तुझा लाड करतात ना बाळ तु खुप लहान आहेस अजून तुला सांगू शकत नाही मी सगळ पण तुला मी माझ्या सारखे नाही बनवून देणार तुला अन्यायाविरोधात लढायला शिकवणार आहे. अवनीला मम्मी काय बोलते याचा अर्थ कळत नाही आणि ती खेळायला निघून जाते.
 आरूषीला एका दिवशी समजते प्रशांत ऑफिस मधल्या मुलीची बदली होते. हे एकून ती सुटकेचा निःश्वास टाकते.आता प्रशांत आरूषी सोबत थोडा चागला वागायला लागतो. अवनीला देखील वेळ देतो. पण आरूषीला अधून मधून मारणे सुरुच ठेवतो. ती बिचारी मुलीचा विचार करून शांत बसते. आरूषीला प्रश्न पडतो. हा एवढा बदलला कसा? कि हा अगोदर पासून असाच होता फक्त माझ्या वडिलांच्या पैसा मिळावा व त्याच्या ओळखीचा फायदा घेऊन आपली कामे व प्रसिद्धी मिळवावी यासाठीच लग्न केलेलं असणार का?ती मार खाण्याला कंटाळून गेलेली असते. तरीही सगळे सहन करत असते. का ते तिचे तिला ही माहिती नसते. तिची व्यथा कधीही न संपणारी आहे.
 असे म्हणतात "पुरूषांना जर बाहेर पुरूषार्थ दाखवता नाही आला तर ते घरात बायकोला मारून तो दाखवतात. " अशा अनेक आरूषी आणि प्रशांत जगामध्ये आहेत. आपल्या वर होणारा अन्याय कधीही सहन करू नका. एक लक्षात ठेवा "अन्याय सहन करणारा हा अन्याय सहन करणार पेक्षाही जास्त चुकीचा असतो."


Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 

टिप:तिची व्यथा कथा वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/04/blog-post.html

तिची व्यथा भाग 2 कथा वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/04/2.html

Comments

Popular Posts