कैसा ये रिश्ता?भाग 2

रिषभ हा अतिशय मेहनती व हुशार असल्यामुळे लवकरच तो ऑफिस मध्ये त्याची एक वेगळी जागा बनवतो. रीयाचे पप्पात्याच्या वर खुप विश्वास ठेवत होते .त्यामुळे बरीचशी महत्त्वाची कामे त्यांच्याकडून करून घेत असतात.एकदा ते कामानिमित्त रिषभला घरी बोलावतात. तो घराच्या बाहेर येतो. तेथे रीया त्याला भेटते. त्याला माहीत नसते रीया त्याच्या सराची मुलगी आहे.
रिया:तु इथे का आलास?
रिषभ:तु इथे काय करतेस?
रिया:हे माझंच घर आहे
रिषभ:हे तुझं नाही माझ्या सरांच घर आहे,काही तरी बोलू नकोस
बोलता बोलता दोघांचेही भांडण सुरू असते. एकही शांत बसायला तयार नसते. तेवढ्यात रियाची मम्मी तेथे येते.ती हे सगळं बघते व रीयाला रागवते. रीया रिषभ तुझ्या पप्पांचया ऑफिसमध्ये काम करतो.त्याला आत येऊ दे.तेव्हा त्याला तिचे नाव रीया आहे हे माहीत होते. तिची मम्मी दोघांनाही घेऊन आत जाते. नंतर तो त्याच्या सरासोबत काम करतो. मॅडम ही स्वभावने खुप चांगल्या असतात. त्या त्याच्या साठी स्वत हा नाष्टा घेऊन जातात. त्याला त्याच्या मम्मीची आठवण येते.रीयाचे कुटूंब खुप मोठे असते.सगळे त्याच्याशी असे वागतात कि तो जसा त्याच्या घरातीलच आहे.त्याला याचे खुप आश्चर्य वाटते कारण त्याच्या घरी काम करण्याने एवढे जवळ कुणी करत नाही. रिषभ त्याचे काम संपवून घरी जायला निघतो.तेव्हा रीया तेथून जात असताने तिचा पाय स्लिप होतो.रिषभ तिला पटकन पकडतो. त्यामुळे ती खाली पडत नाही. त्याला थॅक यु म्हणण्याऐवजी रीया परत त्याच्याशी भांडण करायला सुरुवात करते.तो माञ काहीच न बोलता तिच्याकडे पाहत राहतो. कारण तो रियाचया प्रेमात पडतो. त्याला ती खुप आवडते. काही वेळाने तो निघून जातो.
दुसरया दिवशी तो येतो तेव्हा रीयाचया काकाची मुलगी गार्डन मध्ये बसून काम करत असते. अचानक तिच्या हातून फाईल खाली पडते.रिषभ ते दुरूनच बघतो व तिला मदत करायला जातो.सगळे पेपर जमा करून तिच्या हातात देतो.ती त्याला थॅकयु म्हणते. व त्याला तिची ओळख करून देते.मी प्रिया आहे.रियाची मोठी बहिण व ती त्याच्या बघताक्षणी प्रेमात पडते. नंतर तो त्याच्या कामासाठी आत निघून जातो.
                                 क्रमशः

टिप:कैसा ये रिश्ता भाग 1कथा  खालील लिंक वर क्लिक. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/04/blog-post_18.html

कैसा ये रिश्ता भाग 3कथा खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/04/3_20.html

कैसा ये रिश्ता भाग 4 कथा खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/04/4.html



Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 

Comments

Popular Posts