तिची व्यथा भाग 2

यवहाना आरूषीच्या घरी तिच्या लग्नाचा विषय सुरू झालेला असतो तिला तिच्या घरच्यांना सांगायच असत कि माझ प्रशांत वर खुप प्रेम आहे पण घरचे तयार होणार नाहीत त्यामुळे ती कुणालाच काहीच सांगत नाही.आरूषीसाठी स्थळ यायला सुरुवात होते.पण माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर मला लग्न करायचं अस ती घरी सांगते.घरच्यांना तिचे म्हणणे पटते. काही दिवसासाठी लग्नाचा विषय बंद होतो.ती प्रशांतला सांगते तु बोल माझ्या घरच्यांना पण तो म्हणतो मी सध्या काहीकाहीच करत नाही तुझे घरचे नाही म्हणतील.त्या दोघांचे भेटणं व फोन वर बोलणं सुरुच असते. ते दोघे ही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असतात. दिवसामागून दिवस जात होते. आणि आरूषीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिच्यासाठी स्थळ बघणे सुरू झाले.
पण काही ना काही कारण सांगून आरूषी नाही म्हणायची तर कधी समोरचा मुलगा नाही म्हणून सांगायचा. या काळात प्रशांतचा डिप्लोमा पूर्ण होत आला होता. एका दिवशी आरूषीच्या काकांना त्याचे एक नातेवाईक प्रशांतच स्थळ सुचवतात.तिच्या काकांना ही त्याचा स्वभाव आवडत असतो. शिवाय तो काही दिवसासाठी त्याच्या घरी राहिलेला असतो.व त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती ही चांगली असते.त्याना तो आरूषीसाठी योग्य वाटतो. ते तिच्या वडिलांना प्रशांत विषयी बोलतात. नाही हो म्हणत घरातील सगळे तयार होतात. मग प्रशांतच्या वडिलांना बोलतात ते ही तयार होतात.
प्रशांत आणि आरूषी दोघेही खुप खुश असतात. त्याचा डिप्लोमा पूर्ण झाल्यावर लग्न करायचं असं ठरवतात. त्या अगोदर साखरपुडा करून घेतात. सगळे खुप छान सुरू असते. दोघांचीही लग्नाची खरेदी सुरू होते दागिने व कपडे   घेतल्या गेले.
 प्रशांतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आरूषी व प्रशांतचा लग्न सोहळा पार पडला.लग्नात आरूषीच्या वडिलांनी खुप मोठा हंडा सोने चांदीचे दागिने आरूषी सोबत दिले.लग्नानंतर काही दिवस छान गेले. प्रशांत आरूषी सोबत खुप चांगले वागायचा. तिही त्याच्या आई वडील, भाऊ बहिण सगळयाच सगळे छान करायची. पण म्हणतात ना सुखानंतर दु:ख आणि दु:खा नंतर सुख हे येतच. एका दिवशी आरूषी प्रशांतचे कपडे धुवायला घेते तेव्हा तिला प्रशांतचा खिशात गुटखाच पँकेट सापडते आरूषी प्रशांतला विचारते तु गुटखा खातोस हे मला अगोदर का सांगितलंस. ति त्याला गुटखा सोडून द्यायला सांगते. दोघांचेही खुप भांडणं होतात.तो तिला खुप मारतो. ती खुप रडते.पण तिच्या आई वडिलांना हे ऐकून वाईट वाटेल म्हणूण ती कुणालाच काहीच सांगत नाही. तरी पण ती परत त्या ला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते.पण काहीच फरक पडत नाही तो परत तिला मारतो. हे नेहमीच सुरू  होते. आरूषीला ति त्याला गुटखा सोडून दे हे सांगताना चुकली कि चुकिच्या मुलावर प्रेम केलं हे कळतच नव्हते. शेवटी ती त्याच्या सोबत डोके लावणे सोडून देते.
काही महिने असेच निघून जातात आणि आरूषी प्रेगनेट रहाते.हे समजल्यावर प्रशांत तिची खुप काळजी घ्यायाला लागतो. तिला हवं ते सगळं देतो. पुन्हा सगळे नीट सुरू होते. काळजी घेण्यात 9 महिने निघून जातात. एका दिवशी आरूषी एका गोडस बाळाला जन्म देते. त्याना मुलगी होते, दोघेही खुप खुश असतात. दोघेही मुलीची चांगली काळजी घेतात.ते मुलीचे नाव अवनी ठेवतात. तिचा सगळा वेळ अवनी मध्ये कसा जायचा हे तिला ही कळायचं नाही. हळूहळू अवनी मोठी होत होती. तिची आई तिच्या सोबत वेळ घालवण्यात मग्न होती. याच दरम्यान प्रशांतचा ऑफिस मध्ये एक मुलगी येते. आरूषीला हे काहीच माहिती नसते. पण एक दिवस प्रशांतचा मोबाईल मध्ये ती दोघांचेही फोटो बघते. ती त्याला विचारते ही मुलगी कोन आहे तु मला कधी बोलला नाहीस हिच्या विषयी तो ऑफिस मध्ये आहे. तुला काय सांगण्यासारखं आहे यात ती त्या ला त्या दोघांचे फोटो दाखवते. व त्याला म्हणते माझा तुझ्यावर विश्वास आहे तु अस काहीतरी करणार नाहीस.पण तु मला सांगायला हवं होतं. तिला खुप रडायला येते मी ज्या मुलांवर प्रेम केले तो मुलगा माझ्या पासून कितीतरी गोष्टी लपवतो. याच तिला खुप वाईट वाटत. त्या मुलाविषयी विचारलयामुळे प्रशांत तिला परत खुप मारतो. ति तिच्या मुलीचा विचार करून परत सहन करते. आता तिच मार खाऊन घेणे नेहमीचेच होऊन जाते. तिच्या साध्या बोलणयाचाही चुकीचा अर्थ लावून तो तिला मारतो. ती ते सहन करते. कधी घरच्याचा विचार करून तर कधी मुलीचा विचार करून शांत बसते.तिच काय चुकते हेच तिला कळत नव्हते. शिकलेली असून ही ती हे का सहन करते हे तिचे तिलाच कळत नाही.
लग्नाअगोदर एवढा प्रेम करणारा प्रशांत लग्नानंतर कसा बदलला? प्रेम म्हणजे काय? लग्नानंतर एकानेच सहन करायचं का? प्रशांतची पोलिस केस केली तर अवनीच काय होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आरूषीला मिळतील का?
आरूषीशीने नेमके काय करावे असे तुम्हाला वाटते नक्की कळवा.
                                                      क्रमशः 
तिची व्यथा  कथा  वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://aayubhagwat.blogspot.com/2020/04/blog-post.html



Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 

Comments

Popular Posts