खमंग ढोकळा (khamag dhokla)recipe in marathi
साहित्य:
1वाटी बेसन पीठ,
1वाटी रवा,
चवीनुसार मीठ,
हिरवी मिरची,
कोथींबीर,
1/2चमचा लिंबूसत्व,
थोडी साखर,
1छोटा चमचा बेकिंग सोडा,
मोहरी व तेल
कृती:
बेसन पीठ व रवा एका बाॅउल मध्ये एकञ करून त्यात लिंबूसत्व,मीठ, साखर(हिरव्या मिरचीची थोडीशी पेस्ट घातल्याने छान चव येते) हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे.
भज्याचे पीठ बनवून घेतो तसेच हे मिश्रण बनवून घ्यावे खुप पातळ करू नये.
ढोकळयाची प्लेट असणारे इडली पाञ असेल तर त्यात किंवा एका कढई मध्ये 2ग्लास पाणी घालून ते गरम करून त्यावर एक खोलगट ताट तेल लावून ठेवावे.
बनवले मिश्रण बेकिंग सोडा मिक्स करून ते मिश्रण ताटात नीट पसरून टाकावे.व त्यावर झाकण ठेवावे.
10 मिनिटे झाल्यावर ढोकळा बनला कि नाही ते बघावे.नंतर एका कढई मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी,हिरवी मिरची फोडणी बनवावी व ती ढोकळयावर पसरवून कोथींबीर घालावी. नंतर चमच्याने त्याचे पिसेस बनवून घ्यावेत.अशा प्रकारे ढोकळा तयार झाला.
खमंग ढोकळा रेसिपी टिप:मेेथी पालक पराठे रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://aayubhagwat.blogspot.com/2020/03/blog-post_15.html Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. |
Comments
Post a Comment
तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you