शेव समोसे/मिनी समोसा(sev samosa/mini samosa)recipe in marathi

समोसे म्हटले कि सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटते.आपण नेहमी बटाट्याची भाजी घालून समोसे बनवतो.बटाटा समोसेला एक उत्तम पर्याय आहे तो म्हणजे शेवेचे समोसे.अगदी कमी वेळात हे बनवले जातात.

साहित्य: 
250ग्रॅम शेव,
2मोठे कांदे(बारीक चिरलेली),
कोथींबीर,
 हळद,
 चवीनुसार मीठ,
 1/2लहान चमचा मीठ, 
चवीनुसार तिखट

आवरणासाठी:
 200ग्रॅम मैदा घ्यावा.
 त्यात थोडा ओवा व मीठ घालावे व मोहन घालून नीट मिक्स करून घ्यावे व कणीक मळून घ्यावी. 
तिचे लिंबा एवढे गोळे तयार करावेत.

कृती: 
शेव,कांदा, कोथींबीर तिखट, मीठ एका पातेल्यात नीट मिक्स करून घ्यावे.
 व कणीकेची पुरी लाटावी.
 व तिला मधोमध कापून घ्यावे. 
 कोन बनवून नंतर त्यात बनवलेले सारण भरावे.
 त्याला नीट पॅक करून घ्यावे.
 अशा प्रकारे सगळे समोसे बनवून घ्यावेत.
नंतर कढईत तेल गरम करत ठेवावे.
  त्यात तयार समोसे तळण्यासाठी टाकावेत.
 छान लाल व कुरकुरीत होईपर्यंत तळावेत. 
अशा प्रकारे सगळे समोसे तळून झाल्यावर साॅस किंवा चटणी सोबत खावेत.
टिप:
1)शेव शक्यतो बारीक वापरावी.
2)मैदा ऐवजी गव्हाचे पीठ वापरले तरी चालेल. 
मराठी रेसिपी
शेव समोसे (sev samosa)रेसिपी 


aayubhagwat.blogspot.com

Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 

Comments

  1. समोसे आवडले तर नक्की शेयर करा

    ReplyDelete
    Replies
    1. Wow khup c chhan.... mast aahet recepies n stories ...

      Delete

Post a Comment

तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you

Popular Posts